७ हजार कोटींच्या करारांवर भारत-इस्रायल दरम्यान स्वाक्षर्‍या

0
127

>> कृषी, अंतराळ, संरक्षणासह विविध क्षेत्रात करार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विद्यमान इस्रायल दौर्‍यादरम्यान इस्रायल व भारत यांच्यात १७ हजार कोटींच्या सात करारांवर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या. अंतराळ, कृषी, संरक्षण व अन्य महत्वाच्या क्षेत्रांमध्ये हे करार झाले आहेत. उभय देशांदरम्यानच्या या करारांमुळे जागतिक स्तरावर स्थैर्य व शांतता प्रस्थापनेत मदत होणार असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. मोदी यांनी दिलेले भारत भेटीचे निमंत्रण इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी स्वीकारले आहे.
उभय देशांदरम्यान अंतराळ, कृषी, संरक्षण क्षेत्रात सहकार्य वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. पिण्याचे पाणी व स्वच्छता या क्षेत्रांचाही या सहकार्य करारांत समावेश आहे. जलसंधारण, छोटे उपग्रह यांचाही करारांत अंतर्भाव आहे. याशिवाय गंगा स्वच्छता उपक्रमाअंतर्गत ङ्गनमामी गंगेफ या योजनेसाठीही इस्रायलचे सहकार्य मिळणार आहे. हिंसाचार व दहशतवाद यांचा फटका भारताला अनेकदा बसला आहे. तसा तो इस्रायललाही बसला आहे. त्यामुळे उभय देशांमधील कट्टरतावादाविरोधात लढण्याचा आम्ही संकल्प केला आहे असे पंतप्रधान मोदी यांनी करारावर स्वाक्षर्‍या झाल्यानंतर म्हटले आहे.
भारत-इस्रायल यांच्यातील करारांवर भाष्य करताना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी भारत व इस्रायलमधील संबंधांच्या गाठी स्वर्गात बांधल्या गेल्याची टिप्पणी केली. भारताबरोबर करार करताना आपले मन भरुन आले असल्याचेही ते म्हणाले. आम्ही आज दोन देश म्हणून एक इतिहास रचत आहोत. दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी आम्ही परस्परांना सहकार्य करत राहू असे त्यांनी स्पष्ट केले.