बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला

0
90

नेत्रावळीतील सावरी धबधब्यात मंगळवारी बुडालेल्या वास्को येथील सोहील या युवकाचा मृतदेह काल दु. १ वा. पाण्याबाहेर काढण्यात आला.
मंगळवारी दिवसभर मृतदेह काढण्याचे सांगे पोलीस अग्नीशमक दल व स्थानिक युवकांनी खूप प्रयत्न केले होते. अखेर काल कुडचडे अग्नीशमक दलाने पाण्यातील खडकात अडकलेला मृतदेह काढला.
सुरक्षा प्रश्‍न ऐरणीवर
नेत्रावळीतल्या पर्यटन स्थळाची मजा लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात नेत्रावळीत गर्दी करू लागले आहेत. वनखाते पर्यटक व पर्यटकांच्या वाहनांकडून टॉल गोळा करतात पण त्यामानाने सुरक्षा काहीच देत नसल्याने अशा घटना घडल्यानंतर आपसूकच पर्यटक अन स्थानिक युवक वनखात्याकडे अंगुली निर्देश करू लागले आहेत.
पावसाळ्यात धबधब्यात आंघोळ करणार्‍यांना वनखात्याकडून कसलीच सुरक्षा पूरविली जात नाही. एकाही धबधब्यावर वन खात्याकडून जीवरक्षक तैनात करण्यात आलेले नाही. शिवाय वनखात्याकडे एकही लाईफजॅकेट नाही. अन भरपावसात धो-धो बरसणार्‍या धबधब्यात आंघोळ करण्यास अटकावही केला जात नाही. या ठिकाणी पर्यटकांना कपडे बदलण्याची सुविधाही उपलब्ध नाही.