‘विसंगतीतून विनोद' अशी विनोदाची सोपी छोटी सुटसुटीत व्याख्या केली जाते. परंतु ही विसंगती दर्शविताना त्याला व्यक्तिगत टीकाटिप्पणीची, व्यक्तिगत बदनामीची धार असू नये अशीही अपेक्षा...
कर्नाटकमधील मंत्री, आमदार आणि काही न्यायाधीशांसह 48 जणांना हनीट्रॅपमध्ये अडकवण्यात आल्याचा खळबळजनक आरोप कर्नाटकचे सहकारमंत्री के. एन. राजण्णा यांनी नुकताच कर्नाटक विधानसभेत केला. त्यांच्या...
दिल्ली उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशाच्या घरी कोट्यवधींची रोकड आढळून आल्याने सध्या न्यायालयीन विश्वात मोठी खळबळ माजली आहे. होळीच्या सुटीत न्यायाधीश महोदय घरी नसताना घराला...
ईडी म्हणजेच सक्तवसुली संचालनालयाने गेल्या दहा वर्षांमध्ये 193 राजकीय नेत्यांंविरुद्ध गुन्हे दाखल केले, मात्र, त्यापैकी केवळ दोन गुन्ह्यांमध्ये आरोपींना शिक्षा झाली, अशी कबुली केंद्र...
गोवा फॉरवर्डचे नेते आणि विद्यमान जलस्त्रोतमंत्री विनोद पालयेकर यांनी म्हादईचा प्रश्न लवादाबाहेर सोडविण्याची तयारी अनवधानाने काल दाखवली. नंतर चूक लक्षात येताच लवादबाह्य सोडवणुकीची गोव्याची...
बहुमताचे आकडे जुळवण्याच्या सगळ्या शक्यता मोडून पडल्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन अखेर देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना - राष्ट्रवादी कॉंग्रेस - कॉंग्रेस यांच्या महाराष्ट्र विकास...
गोवा मराठी अकादमी या नव्या सरकारी मराठी अकादमीच्या स्थापनेचे निर्णायक पाऊल सरकारने उचलले आहे आणि येत्या आठ-पंधरा दिवसांत त्याचे सोपस्कार पूर्ण होतील अशी अपेक्षा...
केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने गोव्यातील ७२ खाणपट्ट्यांच्या पर्यावरणीय परवान्यांचे निलंबन मागे घेतल्याने त्या खाणी पुन्हा सुरू होण्याचा मार्ग खुला झाला आहे. राज्यातील खाणी...
मोगल शासक औरंगजेबाच्या कबरीवरून महाराष्ट्रात उद्भवलेला वाद आणि त्या पार्श्वभूमीवर नागपुरात काल उसळलेली दंगल अत्यंत दुर्दैवी आहे. वर्तमानातील महत्त्वाच्या प्रश्नांपासून जनतेचे लक्ष इतरत्र वळवण्यासाठी...
गोवा विद्यापीठातील कथित पेपरफुटी प्रकरणात भौतिकशास्त्र विभागाच्या एका प्राध्यापकाला काल निलंबित करण्यात आले व विद्यापीठाने सत्यशोधन समिती स्थापन केली. गोवा विद्यापीठाच्या आधीच घसरणीला लागलेल्या...
नगरनियोजन कायद्यातील वादग्रस्त कलम 17 (2) खालील नियमावली आणि मार्गदर्शक तत्त्वे घटनाबाह्य ठरवून मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने निकाली काढल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याच्या...
‘राज्यातील सरकारी प्राथमिक शाळा वाचवायच्या असतील तर त्यांचे माध्यम इंग्रजी करावे' असा अनाहूत सल्ला आमदार मायकल लोबो यांनी नुकताच दिला. ज्या स्व. भाऊसाहेब बांदोडकर...
नगरनियोजन कायद्यातील वादग्रस्त कलम 17 (2) खालील नियमावली आणि मार्गदर्शक तत्त्वे हे दोन्हीही निकाली काढून मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने केवळ प्रादेशिक आराखडा 2021...
‘पेराल ते उगवते' म्हणतात. पाकिस्तानच्या नशिबात सध्या हे असावे. पाकिस्तानने जन्मापासून भारताविरुद्ध दहशतवाद पेरला. आता त्याची फळे तो भोगतो आहे. बलुचिस्तानच्या जनतेचा पाकिस्तान सरकार,...
गोवा सरकारच्या दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेमध्ये जवळजवळ सहा हजार बोगस लाभार्थी आढळून आले असल्याची कबुली समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली आहे. अर्थात, हा आकडा...
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आयोजित करत असलेल्या आघाडीच्या स्पर्धांमध्ये विश्वचषकानंतर एखाद्या स्पर्धेचा क्रमांक लागत असेल, तर ती म्हणजे चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेचे एक...