हिंदू लोकसंख्येत 7.8 टक्क्यांनी घट; तर मुस्लिम लोकसंख्येत 43 टक्के वाढ

0
7

950 ते 2015 या काळात भारतातील हिंदूंची लोकसंख्या 7.8 टक्क्यांनी घटली आहे, तर मुस्लिम लोकसंख्या 43.15 टक्क्यांनी वाढली. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या (ईएसी-पीएम) अहवालात ही बाब समोर आली आहे.
‘धार्मिक अल्पसंख्याक : एक क्रॉस-कंट्री विश्लेषण (1950-2015)’ नामक हा अहवाल असून, त्यात जैनांची लोकसंख्या देखील कमी झाली असल्याचे नमूद केले आहे. जैनांची लोकसंख्या 1950 मध्ये 0.45 टक्के होती, जी 2015 मध्ये 0.36 टक्के झाली. अर्थतज्ज्ञ शमिका रवी, अब्राहम जोस आणि अपूर्व कुमार मिश्रा यांनी हा अहवाल तयार केला आहे. 1951 मध्ये झालेल्या जनगणनेनुसार भारतात हिंदूंची संख्या 84.10 टक्के होती; मात्र 2015 पर्यंत हिंदूंची लोकसख्या 77.52 टक्क्यांपर्यंत खाली आली. ही घट 7.8 टक्के एवढी होती. त्याचवेळी याच काळात 1951 मध्ये भारतात मुस्लिमांची संख्या 9.80 टक्के एवढी होती. 2015 पर्यंत त्यात वाढ होऊन ती 14.02 टक्क्यांपर्यंत वाढली. 1951-2015 या काळात मुस्लिम लोकसंख्येमध्ये 43.15 टक्के अशी लक्षणीय वाढ झाली.

ख्रिश्चनांची लोकसंख्या 5.38 टक्क्यांनी वाढली

भारतात केवळ मुस्लिमच नाही, तर शीख आणि ख्रिश्चन धर्मीयांचीही लोकसंख्या वाढली आहे. या अहवालानुसार देशातील शीख लोकसंख्या 6.58 टक्क्यांनी वाढली, असून, ख्रिश्चनांची लोकसंख्या 5.38 टक्क्यांनी वाढली. मात्र देशात पारशी व जैन
धर्मीयांच्या संख्या कमी झाली आहे.