२४ तासांत ४४ मृत्यू, १५८२ बाधित

0
72

>> गुरूवारी ३६९४ जण कोरोनामुक्त

राज्यात कोरोना विषाणूमुळे मृत्यूचे थैमान सुरूच असून काल गुरूवारी कोरोनामुळे ४४ जणांचा मृत्यू झाला. तसेच कोरोनाबाधित १५८२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे सध्याची कोरोनाची रुग्णसंख्या २०,८०८ तर एकूण रुग्णसंख्या १,४१,५६७ एवढी झाली आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २,२७२ एवढी झाली आहे.
काल राज्यात ३६९४ जण कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या १,१८,४८७ एवढी झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.७० टक्के इतके झाले आहे.
काल चोवीस तासांत एकूण ४५८१ स्वॅब चाचण्या करण्यात आल्या. काल कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्याने १३८१ जणांनी घरी तर २०१ नवे रुग्ण इस्पितळात विलगीकरणात राहिले आहेत.

४४ जणांचा मृत्यू
काल राज्यात कोरोनामुळे ४४ जणांचा मृत्यू झाला. त्यात मडगावच्या जिल्हा इस्पितळात १२ जणांचा, गोमेकॉमध्ये २२, इएसआय इस्पितळात दोघांचा, फोंडा, चिखली व कुडतरीतील इस्पितळात प्रत्येकी एक, उत्तर गोव्यातील खासगी इस्पितळात २ इस्पितळात आणि दक्षिण गोव्यातील एका खासगी इस्पितळात तिघांचा मृत्यू झाला. मृत्यू पावलेल्यांमध्ये कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस घेतलेल्या तिघांचा तर दोन्ही डोस घेतलेल्या एकाचा समावेश आहे.

काल मृत्यू पावलेल्यांमध्ये माकाझन येथील ७० वर्षीय नागरिक, आमोणा येथील ४४ वर्षीय पुरुष, करंजाळे येथील ८२ वर्षीय वृद्ध, म्हार्दोळ येथील ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक, मडगाव येथील ८१ वर्षीय पुरुष,कारवार येथील ७६ वर्षीय वृद्ध, कुडचडेतील ४९ वर्षीय व्यक्ती, माजोर्डा येथील ६० वर्षीय महिला, कुडतरी येथील ७४ वर्षीय ज्येष्ठ नागरिक,सांगेतील ४४ वर्षीय युवक, कासावलीतील ८६ वर्षीय महिला, वास्कोतील ५५ वर्षीय महिला, ताळगावातील ७८ वर्षीय महिला, साखळीतील ५८ वर्षीय पुरुष, साखळातील ५० वर्षीय पुरुष, हणजुणे येथील ७० वर्षीय महिला, कुडका येथील ७० वर्षीय महिला, केपेतील ६२ वर्षीय महिला, कुडतरीतील ४९ वर्षीय महिला यांचा समावेश आहे.

एकाच कुटुंबातील
तिघांचा मृत्यू
कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेचा फटका एका कुटुंबाला बसल्याची घटना काल उघड झाली. पणजी आकाशवाणी केंद्रातील एका निवेदिकेचे पती, त्यांची सासू व सासरे यांचे कोरोनामुळे निधन झाले. या घटनेमुळे सदर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे