प्रतापसिंह राणेंचा नेहमीच श्रीपाद नाईक यांना पाठिंबा

0
5

>> विश्वजीत राणे; सत्तरीतून सर्वाधिक मते मिळणार

गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि आपले वडील प्रतापसिंह राणे यांचा लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक यांना पाठिंबा मिळत होता. त्यामुळे प्रत्येक वेळी ते भरघोस मतांनी निवडून येत होते. येत्या निवडणुकीत सत्तरी तालुक्यात भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक यांनी सर्वाधिक मते मिळतील, असा दावा मंत्री विश्वजीत राणे यांनी भाजप मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल केला.

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा स्वीकारली आहे. काँग्रेस हा विषय माझ्या डोक्यात येत नाही, असेही राणे म्हणाले.
मागील आठ वर्षांपासून आपण भाजप आणि संघाचे काम मनापासून करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजपची विचारधारा घेऊनच आपण लोकांमध्ये काम करीत आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी साळगावचे आमदार केदार नाईक, भाजपचे प्रदेश सरचिटणीस दामू नाईक यांची उपस्थिती होती.