Home Featured कोविड रुग्णवाहिकेसाठी दर निश्‍चित

कोविड रुग्णवाहिकेसाठी दर निश्‍चित

0

>>उच्च न्यायालयाच्या सूचनेनंतर सरकारचे पाऊल

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने केलेल्या सुचनेनुसार राज्य सरकारने कोविड रुग्णांसाठीची खासगी रुग्णवाहिका सेवा तसेच कोविड मृतांसाठीच्या शववाहिकेचे दर निश्‍चित केले आहेत. या आदेशानुसार रुग्णवाहिकेसाठीचे दर १० किमीपर्यंतच्या अंतरासाठी १५०० रुपये व १० किमीवरील प्रतिकिलोमीटर अंतरासाठी ५० रुपये व परतीचे शुल्क म्हणून प्रति किमी २५ रुपये असे दर निश्‍चित केले आहेत. त्याचप्रमाणे ‘बेसिक लाईफ सपोर्ट’ रुग्णवाहिकेसाठी १० किमीपर्यंतचे दर हे २ हजार रुपये आणि १० किमीपेक्षा जास्त अंतरासाठी प्रत्येक किमीमागे ५० रुपये, परतीचे शुल्क प्रति किमीसाठी २५ रुपये तर १० किमीपेक्षा जास्त अंतरासाठी प्रत्येक किमीमागे ५० रुपये शुल्क केले आहे. शववाहिकेसाठी १० किमीपर्यंतच्या १५०० रुपये आणि त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी प्रत्येकी २५ रुपये आणि परतीचे शुल्क म्हणून १२.५० रुपये दर निश्‍चित केले आहेत.