कोरोना विषाणूचे एअरोसोल हवेत १० मीटरपर्यंत पसरतात

0
155

>> केंद्र सरकारच्या सूचना जारी

कोरोना विषाणूचे एअरोसोल हवेत १० मीटरपर्यंत पसरू शकतात असे केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचनांत म्हटले आहे. कोरोनाचा संसर्ग हा प्रामुख्याने लाळ आणि नाकाद्वारे होतो. यात संसर्ग असलेल्या रुग्णाकडून ड्रॉपलेट्स आणि एअरोसोलद्वारे व्हायरस इतरांपर्यंत पोहोचतो. पॉझिटिव्ह रुग्णाच्या लाळ किंवा नाकापासून २ मीटर दूरपर्यंत ड्रॉपलेट्स पडतात. पण एअरोसोलचे छोटे कण हे १० मीटरपर्यंत हवेतून पसरतात, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.

केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार विजय राघवन यांच्या कार्यालयाकडून ही इजी टू फॉलो ही ऍडवायजरी जारी करण्यात आली आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क घाला, सामाजिक अंतर पाळा, वारंवार हात धुवा, स्वच्छता पाळा अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

पॉझिटिव्ह रुग्णाच्या नाक किंवा तोंडातून निघालेले थेंब पृष्ठभागावर पडतात. तिथे विषाणू अधिक काळ टिकून राहतो. यामुळे असे पृष्ठभाग सतत स्वच्छ करून निर्जंतूक करावेत असे यात म्हटले आहे.