सेटलवाड यांची अटक लांबणीवर अटकेस १९ पर्यंत स्थगिती

0
83

कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी समाज कार्यकर्त्यां तिस्ता सेटलवाड व त्यांचे पती यांची संभाव्य अटक आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आणखी सहा दिवसांनी लांबणीवर पडली आहे.
या प्रकरणी काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाल्यानंतर न्यायालयाने प्रथम उभयतांना आधी शरण या व नंतर जामीनासाठी अर्ज करा असे सुचविले होते. मात्र नंतर युक्तीवाद झाल्यानंतर त्यांना १९ फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले.सेटलवाड यांची बाजू ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल मांडत होते. युक्तीवादांदरम्यान न्यायालयाने त्यांच्यासमोर अनेक सवाल उपस्थित केले. उभयतांवरील आरोप गंभीर असल्याचे या प्रकरणी राजकारण आणण्याचा कोणी प्रयत्न करू नये असा इशारा न्यायालयाने दिला.
न्यायमूर्ती एस. जे. मुखोपाध्याय व एन. व्ही. रमण यांच्या खंडपीठाने हे प्रकरण न्यायालय कोणत्याही सर्व साधारण नागरिक किंवा व्यक्तीप्रमाणेच हाताळणार असल्याचे स्पष्ट केले. ‘आम्ही एफआयआरनुसार आरोपांकडे पाहणार आहोत’ असे न्यायमूर्तीनी स्पष्ट केले. गुजरात उच्च न्यायालयाने सेटलवाड दांपत्याचा जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे.