‘सिंधू’ करारप्रश्‍नी तातडीने सुनावणीची गरज नाही

0
105

>> सर्वोच्च न्यायालयाचा अभिप्राय

 

भारत-पाकिस्तान सिंधू पाणी करार घटनाबाह्य असल्याचे जाहीर करण्याची मागणी करणार्‍या जनहितार्थ याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने काल नकार दिला.
‘या प्रकरणी सुनावणी तातडीने घेण्याची गरज नाही. योग्य वेळेत त्यावर सुनावणी होईल’ असा अभिप्राय मुख्य न्यायमूर्ती टी. एस. ठाकूर व न्या. ए. एम. खानविलकर यांच्या खंडपीठाने संबंधित याचिकेसंदर्भात व्यक्त केला. ऍड. एम. एल. शर्मा यांनी ही याचिका या न्यायालयात सादर केली
आहे.
सदर करार घटनात्मक योजनेनुसार करण्यात आला नव्हता. त्यामुळे तो अवैध ठरवावा अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. मात्र न्यायालयाने ‘राजकारण बाजूला ठेवा. प्रकरण योग्य वेळी सुनावणीस घेऊ’ असे याचिकादारास सुनावले.