वास्कोत दिवसाढवळ्या मंगळसूत्र हिसकावले

0
105

बाजारहाट करून घरी परतत असताना ड्रायव्हरहील वास्को येथील हर्षा मामलेकर या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी हिसकावून घटनास्थळावरून पोबारा केला. ते मंगळसूत्र दीड लाख रुपये किंमतीचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. वास्को पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक निखील पालयेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार काल सकाळी ११ च्या सुमारास ही चोरीची घटना घडली. ४५ वर्षीय हर्षा बाजारातून भाजीची खरेदी केल्यानंतर घरी परतत असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवरून दोन अज्ञात चोरटे आले व दुचाकीवर मागे बसलेल्या अज्ञात चोरट्याने गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला. सदर अज्ञात चोरट्याने तोंडावर हेल्मेट अथवा मास्क घातलेले नव्हते.