रुद्रेश्वर पणजीचे ‘महाप्रस्थान’ प्रथम

0
113
गोवा कला अकादमीच्या ‘अ’ गट नाट्य स्पर्धेचे प्रथम पारितोषिक संस्कृतीमंत्री दयानंद मांद्रेकर यांच्याकडून स्वीकारताना रुद्रेश्वर पणजीचे कलाकार. सोबत कला व कला अकादमीचे सदस्य सचिव प्रसाद लोलयेकर व अन्य. (छाया : किशोर स. नाईक)

कला अकादमी ‘अ’ गट नाट्यस्पर्धा निकाल जाहीर
कला अकादमीच्या अ गट मराठी नाट्य स्पर्धेत ‘रुद्रेश्वर’ पणजीच्या ‘महाप्रस्थान’ला एक लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. वरदांबिका कला संघ, फोंडाच्या ‘मन वढाय वढाय’ला द्वितीय तर भार्गवी थिएटर्सच्या ‘रणसावट’ला तृतीय पारितोषिक देण्यात आले. प्रत्येकी २५ हजाराची उत्तेजनार्थ पारितोषिके हंस संगीत नाट्यमंडळ, फोंडाच्या ‘जठरानल’ व सिद्धी विनायक क्रिएशन, पणजीच्या ‘जिल्ले सुव्हानी’ या नाटकांना प्राप्त झाली.दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक (रु.१०,०००) ‘महाप्रस्थान’चे दिग्दर्शक प्रा. अफसर हुसेन यांना, द्वितीय पारितोषिक (रु. ७०००) ‘मन वढाय वढाय’चे दिग्दर्शक अजित कामत यांना तर तृतीय पारितोषिक (रु. ५०००) ‘जठरानल’चे दिग्दर्शक विजयकुमार नाईक यांना प्राप्त झाले.
इतर पारितोषिके ः- वैयक्तिक अभिनय (पुरूष)- प्रथम (७००० रु.) विश्‍वजित फडते (मुबारक शहा जिल्ले सुव्हानी-सिद्धी विनायक क्रिएशन, द्वितीय (५००० रु.) दीपक आमोणकर (महाप्रस्थान), प्रशस्तीपत्रके – गजानन झर्मेकर (‘कुत्रे’, अवतार आर्ट ऍण्ड कल्चरल सोसायटी, बांबर), राजीव हेदे (‘एक था गुरू’, गोमंत विद्या निकेतन), अजित केरकर (‘रंगयात्री’, नागेश प्रासादीक नाट्यसमाज, बांदीवडे), मंदार जोग (जठरानल), वर्धन कामत (‘एक झुंज वार्‍याशी’, मांगिरीश युथ क्लब, मंगेशी), सौरभ कारखानीस (‘चिताई’, कला ओंकार, पणजी).
वैयक्तिक अभिनय (स्त्री) – प्रथम सौ. गौरी कामत (मन वढाय वढाय), द्वितीय – सौ. वृंदा नाईक (रणसावट), प्रशस्तीपत्रके – पूर्ती सावर्डेकर (महाप्रस्थान), बबिता आंगले (एक था गुरू), प्राची जोशी (मन वढाय वढाय), चतुरा रायकर (जठरानल), शर्मिला नाईक (‘बत्तीगुल’, ऍम्यॅच्युअर्स, वास्को).
नेपथ्य – योगेश कापडी (महाप्रस्थान), प्रशस्तीपत्र – सदानंद नाईक (रणसावट), प्रकाश योजना – विजु कांबळी (जिल्ले सुव्हानी), प्रशस्तीपत्रक – सतीश नार्वेकर (महाप्रस्थान), वेशभूषा – विजयकुमार नाईक (जठरानल), प्रशस्तीपत्रक – दत्ताराम भालेकर (जिल्ले सुव्हानी), ध्वनी संकलन/पार्श्‍वसंगीत – प्रसन्न कामत (मन वढाय वढाय), प्रशस्तीपत्रक – मयुरेश वस्त (रणसावट), रंगभूषा – जयंत नाटेकर (रणसावट), प्रशस्तीपत्रक – एकनाथ नाईक (एक था गुरू).
लेखन – प्रथम (रु. १०,०००) सोमनाथ नाईक (जठरानल), द्वितीय प्रशांत म्हार्दोळकर (मन वढाय वढाय). नाट्यस्पर्धेचे परीक्षण – डॉ. तुलसी बेहरे, शिरीष घाग व डॉ. राजीव मोहोळकर यांनी केले तर नाट्य संहिता लेखनाचे परीक्षण डॉ. प्रकाश वजरीकर यांनी केले. या स्पर्धेत १४ संस्थांनी प्रवेशिका सादर केल्या होत्या पैकी ११ संस्थांनी नाटके सादर केली.
कला व संस्कृती खात्याचे मंत्री दयानंद मांद्रेकर यांच्या हस्ते सोमवारी मा. दीनानाथ मंगेशकर कला मंदिरात विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. यावेळी अकादमीचे सदस्य सचिव प्रसाद लोलयेकर उपस्थित होते.