राज्यात १२ हजार लिटर मद्य जप्त ः कुणाल

0
65

आतापर्यंत मतदारांना पैसे वाटल्याच्या तक्रारी आलेल्या नाहीत. परंतु काल दक्षिण व उत्तर गोव्यात मिळून सुमारे १२ हजार लिटर मद्य जप्त केल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी दिली.

केरी येथील चेक नाक्यावर पोलिसांनी तीन ट्रक ताब्यात घेऊन त्यातील ११० गुटखा व तंबाखूच्या बॅगा जप्त केल्या आहेत. वाहने तपासण्यावरच अधिक भर देण्यात आला आहे. बंदोबस्तातही वाढ केली आहे. मंगळवारी रात्री ताब्यात घेतलेल्या मालवाहू ट्रकातील ८० दुचाक्यांची वाणिज्य खाते चौकशी करीत आहेत. अद्याप अहवाल आलेला नाही, असे कुणाल यांनी सांगितले. कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत विशेष समस्या निर्माण झालेली नसून वातावरण समाधानकारक असल्याचे सांगण्यात आले.