सडा कारागृहात कैदी कारबोटकर मृतावस्थेत

0
132

>> कैद्यांनी घातलेल्या हैदोसात लाखोंचे नुकसान

सडा उपकारागृह सतत चर्चेत
सडा उपकारागृहातून गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एक कैदी पळाला होता. मात्र, दुसर्‍या कैद्याने त्याला पकडून सुरक्षा रक्षकाच्या हवाली केले होते. त्याआधीही येथून अनेक कैदी पळाले आहेत.
कारागृहाच्या भिंतींना तडे गेल्याचे आढळून आल्याने आणखी कैदी पळून जातील या भीतीने इमारतीच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात आले आहे.
दोन वर्षांपूर्वी सडा उपकारागृहात जेवण वाढले जात असताना कैद्यांत हाणामारी झाली होती. त्यात एक कैदी जखमी झाल्याने त्याला इस्पितळातही दाखल करावे लागले होते. शौचालयाच्या भिंतीवरून उडी मारून कैदी पळाल्याचीही येथे उदाहरणे आहेत.

सडा येथील उपकारागृहात मंगळवारी रात्री उशिरा कैद्यांनी उठाव करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. कारागृहात अश्पाक बेंग्रे हत्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुन्हेगार विनायक कारबोटकर हाही मृत्युमुखी पडल्याने या सार्‍या प्रकाराबाबत गूढ निर्माण झाले आहे. कैद्यांनी घातलेल्या हैदोसात कारागृहातील मालमत्तेची मोठी हानी झाली असून लाखोंचे नुकसान झाले आहे. कैद्यांशी झालेल्या झटापटीत तुरुंगाधिकारी विठ्ठल गावस हे गंभीर जखमी झाले आहेत, तर इतर सुरक्षा रक्षकांनाही जखमा झाल्याने त्यांना तातडीने वास्कोच्या खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. गावस यांच्यावर गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात उपचार सुरू आहेत. या संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी सुरू असल्याची माहिती तुरुंग महानिरीक्षक सिद्धिविनायक नाईक यांनी दिली.

मुरगाव सडा उपकारागृहात मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास कारागृहातील ४९ कैद्यांनी अचानक गोंधळ घालून पलायन करण्याचा प्रयत्न केला. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गेलेले तुरुंगाधिकारी आणि सुरक्षा रक्षकांवर हल्ला चढवून या कैद्यांनी बराकीतून बाहेर धाव घेतली. तुरुंगाधिकारी विठ्ठल गावस यांना जबर मारहाण करण्यात आली. इतर सुरक्षारक्षकांनाही मारहाण करण्यात आली. या कैद्यांनी तुरुंगातील सर्व सीसीटीव्ही, सर्व्हर, संगणक, खुर्च्या, टीव्ही तसेच तावदानांची तोडफोड केली. सहायक अधीक्षकांच्या केबीनची मोडतोड करून नंतर सर्वांनी कारागृहाच्या तळमजल्यावरील मुख्य गेटवर धाव घेऊन तेथील सुरक्षा रक्षकाला मारहाण करून कारागृहाच्या प्रांगणात प्रवेश केला. तेथे उभी असलेली सुमो जीप, रुग्णवाहिका यांच्या काचा फोडल्या गेल्या. मात्र, या उपकारागृहाचे मुख्य प्रवेशद्वार कुलूपबंद असल्याने कैद्यांना बाहेर पडता आले नाही. कैद्यांनी कारागृहाचा वीजपुरवठाही बंद पाडल्याने सर्वत्र अंधार झाला. मात्र, तुरुंगातील कर्मचार्‍यांनी पोलिसांना कळविताच मुरगाव आणि वास्को येथून पोलीस दले तातडीने सडा कारागृहाबाहेर दाखल झाली. जवळजवळ तीनशे पोलिसांनी संपूर्ण उपकारागृहाला गराडा घालून कैदी पळून जाणार नाहीत याची दक्षता घेतली. काही कैद्यांनी संरक्षक भिंत पार करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या मुसक्या वेळीच आवळण्यात पोलिसांना यश आले. रात्रभर कारागृहाबाहेर कडक पहारा ठेवण्यात आला.
पोलीस उपअधीक्षक लॉरेन्स डिसोझा व उपजिल्हाधिकारी गौरीश शंखवाळकर हेही मध्यरात्री घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांचा मोठा फौजफाटा कारागृहात दाखल झाल्यानंतर गोंधळ घालणार्‍या सर्व कैद्यांना पुन्हा कोठडीत डांबण्यात आले. कारागृहात अंधार असल्याने त्यांना पकडण्यासाठी पोलिसांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले.
दरम्यान, या कारागृहात अश्पाक बेंग्रे हत्या प्रकरणी शिक्षा भोगत असलेला विनायक कारबोटकर हा कुख्यात गुन्हेगार कारागृहात मृतावस्थेत सापडला असून त्याचा मृत्यू कसा झाला याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कैद्यांनी जो उठाव केला, त्याचा कारबोटकर हा सूत्रधार असल्याचे सांगितले जाते. कारबोटकर याला कोलवाळ येथील नव्या कारागृहात हलवण्यात येणार होते. मात्र, त्याला कोलवाळला जायचे नव्हते. त्यामुळे त्याने तुरुंगातून पळ काढण्याचा बेत आखला होता असा कयास व्यक्त होत आहे.
दरम्यान, तुरुंग महानिरीक्षक सिद्धिविनायक नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, कैद्यांनी कारागृहाच्या मालमत्तेची नासधूस केल्याने लाखो रुपयांची हानी झाली आहे. सडा उपकारागृहात दुरुस्तीकाम हाती घेण्यात येणार असल्याने या कैद्यांना शुक्रवारी दि. २७ रोजी कोलवाळ तुरुंगात हलविण्यात येणार होते. इमारतीच्या डागडुजीच्या कारणास्तव यापूर्वी काही कैद्यांना कोलवाळ येथे हलवण्यात आले आहे. मात्र, काल रात्री झालेल्या या प्रकारामुळे आता उर्वरित कैद्यांनाही कोलवाळ तुरुंगात हलविण्यात येणार येत आहे. विनायक कारबोटकर हा कैदी अश्पाक बेंग्रे खून प्रकरणी शिक्षा होऊन सडा उपकारागृहात शिक्षा भोगत होता. त्याची दुसर्‍या कोठडीतील कैद्यांशी बाचाबाची झाली. त्याची परिणती म्हणून दोन्ही गटांतील आरोपींनी बराकींबाहेर येऊन हैदोस घातल्याचा दावा नाईक यांनी केला. कारबोटकर याच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नसल्याचे त्यांनी सांगितले.
कारबोटकर याला कालच पणजी न्यायालयात सुनावणीसाठी नेण्यात आले होते. बुधवारी त्याची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस येथील न्यायालयात सुनावणी होती. कारबोटकर याला कोलवाळच्या कारागृहात ठेवावे की महाराष्ट्रातील कारागृहात रवानगी करावी यासंबंधी बोलणी सुरू होती. पण कारबोटकर हा कोलवाळ किंवा महाराष्ट्रात जायला तयार नव्हता. आपल्याला सडा कारागृहातच ठेवावे असा आग्रह त्याने अधिकार्‍यांपाशी धरला होता. रात्री कारागृहात काय घडले त्याची चौकशी केली जाईल असे ते म्हणाले. या प्रकरणी मुरगाव पोलीस स्थानकात सहायक तुरुंग अधीक्षक भानुदास पेडणेकर यांनी तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, सडा उपकारागृहात यापूर्वी कैद्यांमध्ये अनेकदा हाणामारी झाली आहे. परंतु प्रथमच एका कैद्याचा मृत्यू झाल्याने त्याची चौकशी उच्चस्तरीय अधिकार्‍यांकडून होणार आहे. कारबोटकर कोलवाळ कारागृहात जायला तयार नव्हता. तेथे आपल्या जिवाला धोका आहे असे त्याला वाटत होते अशी माहितीही प्राप्त झाली आहे.
भाजपचा पराभव हेच उद्दिष्ट ः तिंबले
सांगोल्डाचे सरपंच नीळकंठ नाईक, पंच दिव्या पालयेकर, पंच नीता कांदोळकर, स्वीकृत पंच चंद्रकांत पिकुळकर, समाजसेवक राया कांदोळकर, बन्सिलाल नाईक, मायकल डायस, माजी सरपंच दिलीप कळंगुटकर व माजी पंच कॅजिटन ङ्गर्नांडिस, समाजसेवक पुरुषोत्तम शिरोडकर, गिरीचे पंच सानी नानोडकर, बाबू मोरजकर, माजी पंच बाबाजी गडेकर, समाजसेवक रमेश इन्सुलकर व आलेक्स कुतिन्हो यांनी काल पत्रकार परिषदेत आपण गोवा ङ्गॉरवर्ड पक्षात प्रवेश केल्याचे जाहीर केले. तसेच साळगाव मतदारसंघातील त्यांचे उमेदवार जयेश साळगावकर यांना आपला पाठिंबा जाहीर केल्याचे स्पष्ट केले. उमेदवार जयेश साळगावकर हेही यावेळी हजर होते. पक्षाचे अन्य एक नेते प्रशांत नाईक यांनी यावेळी भाजपचे साळगावचे उमेदवार दिलीप परुळेकर यांच्यावर जोरदार टीका केली.