नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेत पारदर्शकता येईल : राष्ट्रपती

0
91

काळ्या पैशाला चाप लावण्यासाठी घेतलेल्या नोटाबंदी निर्णयामुळे अर्थव्यवस्थेत तात्पुरती मंदी येईल. मात्र, कॅशलेस व्यवहारांमध्ये जितकी वाढ होईल त्यानुसार अर्थव्यवस्थेतील पारदर्शकतेत वाढ होईल असे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी काल प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करताना सांगितले.

राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात नोटाबंदी, भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल, भारतीय लोकशाही अशा महत्त्वाच्या मुद्यांवर भाष्य केले. सशक्त लोकशाहीसाठी सहिष्णुता, संयम व आदर या मूल्यांशी बांधीलकी राखणे आवश्यक असल्याचे त्यांनी
सांगितले.
समाजाच्या भल्यासाठी डिजिटल इंडिया व मेक इन इंडिया सारखे अनेक महत्त्वाकांक्षी उपक्रम होती घेण्यात आल्याचे राष्ट्रपती म्हणाले. अन्नसुरक्षा पुरवण्यासाठी अधिक मेहनतीची गरज त्यांनी प्रतिपादली.