राज्यात आतापर्यंत २४ इंच पावसाची नोंद

0
113

राज्यात चोवीस तासात २.९० इंच पावसाची नोंद झाली असून पेडणे, वाळपई, म्हापसा आणि फोंडा या भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. राज्यात मोसमी पावसाची आत्तापर्यंत २३.९७ इंच एवढी नोंद झाली आहे.

राज्यात मागील तीन दिवस जोरदार पावसाची नोंद झाली. गुरूवारी पावसाचे प्रमाण थोडे कमी दिसून आले आहे. शुक्रवारपर्यंत काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
चोवीस तासांत पेडणे येथे सर्वाधिक ५ इंच पावसाची नोंद झाली आहे. वाळपई येथे ४.६६ इंच, म्हापसा येथे ३.५५ इंच, फोंडा येथे ३.४५ इंच, पणजी येथे २.६० इंच, ओल्ड गोवा येथे २.२४ इंच, साखळी येथे ३.४५ इंच, केपे येथे ३.४८ इंच, सांगे येथे ३.३३ इंच, मुरगाव येथे १.६६ इंच, मडगाव येथे २.१३ इंच, दाबोळी येथे १.६९ इंच, काणकोण १.५३ इंच पावसाची नोंद झाली आहे.

मुंबईसह कोकण किनारपट्टीत
मुसळधार पावसाचा इशारा

गोव्यासह महाराष्ट्रात मान्सूनच्या जोरदार आगमनानंतर अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून याचा फटका अनेक गावांना बसला आहे. आता मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत पुढील २ दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या जिल्ह्यांत आज १८ आणि उद्या १९ जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने गुरुवारी व्यक्त केली.