राज्यसभेसाठी तेंडुलकर सोमवारी अर्ज भरणार

0
63

राज्यसभा निवडणुकीसाठी राज्यातील सत्ताधारी आघाडीचे उमेदवार म्हणून निवड झालेले प्रदेश भाजपचे अध्यक्ष विनय तेंडुलकर येत्या सोमवारी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकार्‍यांसमोर सादर करणार आहेत.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी तेंडुलकर यांच्या नावांवर यापूर्वीच शिक्कामोर्तब केले होते. त्यानंतर प्रदेश भाजप निवडणूक समितीने त्याला मान्यता दिली. आता त्यांचे नाव केंद्रीय निवडणूक समितीकडे पाठविले आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सरकारच्या घटक पक्षांच्या नेत्यांशी बोलणी करूनच तेंडुलकर यांचे नाव निश्‍चित केल्याचे पक्षाचे प्रवक्ते सदानंद तानावडे यांनी सांगितले.
राज्यसभा उमेदवारीसाठी आपल्या नावाची प्रदेश निवडणूक समितीने निवड केल्याने आपण समाधानी असून पक्ष सेवेची ही पावती असल्याचे तेंडुलकर यांनी सांगितले. सरकारच्या घटक पक्षांना विश्वासात घेवूनच तेंडुलकर यांची वरील उमेदवारीसाठी निवड केल्याचे आमदार निलेश काब्राल यांनी सांगितले.