‘त्या’ बंडातील १५ वीर पुरुषांचे पणजीतील रोज गार्डनमध्ये स्मारक

0
80

गोव्यात १७८७ साली पोर्तुगीजांविरुद्ध एक बंड रचण्यात आले होते. ते बंड म्हणजे पिंटोचे बंड. मात्र, दुर्दैवाने हे बंड फसले व या बंडाचा कट रचलेल्या सर्वांची पोर्तुगीज सैनिकांकडून अत्यंत अमानुषपणे हत्या करण्यात आली. कांदोळीस्थित तिघा धर्मगुरूंनी हे बंड पुकारले होते. यापैकी बंडाची योजना आखलेले प्रमुख धर्मगुरू हे पिंटो घराण्यातील होते. गावातील कित्येक लोकांनी या बंडासाठी सहकार्य करण्याची तयारी दाखवली होती.
ह्या बंडाचा उल्लेख करण्याचे कारण एवढेच की ह्या बंडात सहभागी झालेल्या व हौतात्म पत्कराव्या लागलेल्या सर्व १५ ही वीरपुरुषांचे एक स्मारक पणजीतील ‘रोज गार्डन’मध्ये उभारण्यात येणार आहे. त्याविषयीची सगळी तयारी पूर्ण झालेली आहे, असे पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळयेंकर यांनी सांगितले.
ते म्हणाले की, आपण भारतातील परकीय शक्तींविरुद्धचा महिला लढा म्हणून १८५७ च्या बंडाचा अभिमानपूर्वक उल्लेख करतो. (१८५७ च्या बंडात मंगल पांडे तसेच झांशीची राणी लक्ष्मीबाई आदींनी भाग घेतला होता.) पण या लढ्याच्या ७० वर्षांपूर्वीच गोव्यात पिंटोंचे बंड रचण्यात आले होते. मात्र, सुदैवाने हे बंड फसले आणि बंडात सहभागी झालेल्या १५ स्वातंत्र्यवीरांची पोर्तुगीज सैनिकांनी निर्घृणरित्या हत्या केली. या बंडात ४७ जण सहभागी झाले होते. पण प्रमुख नेते होते ते १५ जण. त्या सर्व १५ जणांना घोड्यांना बांधून शहरातून फरफटत नेण्यात आले. त्यानंतर ते मृत झाल्यानंतर त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून ते सार्वजनिक ठिकाणी टाकून देण्यात आले. ९ डिसेंबर १७८८ साली बंडात सहभागी झालेल्या १५ जणांना कोर्टाने शिक्षा ठोठावल्यानंतर त्यांची वरील प्रकारे निर्घृणरित्या हत्या करण्यात आली. गोव्यासाठी बलिदान दिलेल्या या शूर हुतात्म्यांचे स्मारक आता पणजीतील रोझ गार्डनमध्ये उभे राहणार असल्याने पर्यटकांनाही या फसलेल्या बंडाचा इतिहास कळू शकेल, असे कुंकळ्येकर यांनी स्पष्ट केले.