म्हापशातील अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

0
89

येथील झेव्हियर कॉलेजसमोर मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास स्वीफ्ट कार व मोटारसायकल यांची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात दुचाकीचालक राजेश रमेश अणवेकर (३६) हा जागीच ठार झाला. तो मूळचा बेळगाव येथील असून सध्या अन्साभाट, म्हापसा येथे राहत होता. स्वीफ्ट कार क्र. जीए-०३- वाय – ५९०३ गणेशपुरीमार्गे म्हापशाला येत होती. तर जीए ०३ – एए – ३२७४ क्रमांकाच्या मोटारसायकलने राजेश गणेशपुरीकडे जात होता. झेव्हियर कॉलेजसमोर दोन्ही वाहनांची जोरदार टक्कर झाली.