चित्रपटांत फरक करत नाही : नाना

0
92
dav

नाटकातूनच माझी अभिनयाची कारकीर्द सुरू झाली. स्मीता पाटीलमुळे मी सिनेमात आलो. ‘आज की आवाज’मध्ये स्मीता, राज बब्बर बरोबर भूमिका केली. एन. चंद्रा यांच्या ‘अंकुर’मुळे थोडं नाव झालं. मी चित्रपटात व्यावसायिक किंवा सर्वसाधारण असा फरक करत नाही. भूमिकेत शिरल्यानंतर भूमिकेचे सुख-दु:ख आमचे होते असे सांगून ख्यातनाम अभिनेते नाना पाटेकर यांनी कॅमेरा बाजूला झाल्यानंतर नटाने नेहमीचे जीवन जगले पाहिजे. शरीर रक्षकांची गरज पडता कामा नये. रसिक प्रेक्षकच आपले शरीररक्षक असतात असे मत इफ्फीतील कट्ट्यावर व्यक्त केले.

कट्ट्यावर सचिन चाटे यांनी त्यांच्याशी काल संध्याकाळी संवाद साधला. ‘क्रांतीवीर’ या आपल्या चित्रपटासंबंधी बोलताना त्यांनी सांगितले की हिंदू मुसलमानांची डीएनए काढा रक्त एकच आहे. राजकारणी आपल्याला भडकावीत असतात. रस्त्यावरील प्रेक्षक आणि बुद्धिमान प्रेक्षक या दोन्हीना तेवढाच चित्रपट आवडेल. दोघे तेवढ्याच तन्मयतेने तो बघतील तोच चित्रपट मी मानतो.

सामाजिक बांधीलकी प्रत्येकाला हवी याची जाणीव देऊन ते म्हणाले, एका उपेक्षित मुलाचे शिक्षण केले, एका मुलाला वाचवले तरी खूप आहे. आपण आज एवढे दैनंदिन जीवनात मग्न असतो, की या गोष्टीच विसरून जातो. संजय करण्याची वृत्ती आपल्यात बळावली आहे. मुलांसाठी एवढा संचय करण्याची आज गरज आहे का, की जाताना वर काही न्यायचे आहे? असा प्रश्‍न त्यांनी केला. शेतकर्‍यांचे अश्रू आज सुकले आहेत याकडे लक्ष वेधून त्यांनी सांगितले, मी कुठल्याच पक्षाचा नाही परंतु आज केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार त्यांच्यासाठी काहीतरी करत आहे याबद्दल समाधानी आहे.

नाम फाऊंडेशनच्या कार्याबद्दल आपण समाधानी असल्याचे नमूद करून किसान आणि जवान आपण विसरतो. त्यांच्यासाठी माझ्या मिळकतीतील हिस्सा जातो ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे असे त्यांनी सांगितले. बा. भ. बोरकरांची आपली आवडती कविता ‘दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती…’ त्यांनी या अनुषंगाने म्हटली. संवाद म्हणण्यासाठी तर त्यांना सारखा रसिकांनी आग्रह केला. पण त्यांनी नटसम्राटमधील एक संवाद सुरुवातीला म्हटला व तसे वातावरण असल्याशिवाय संवाद म्हणायला उत्साह येत नसल्याचे सांगितले.

‘कट्टा’ उपक्रमात आज
कक्कड, सोनाली व प्रभावळकर
‘कट्टा’ या उपक्रमात आज समीत कक्कड, सोनाली कुलकर्णी व दिलीप प्रभावळकर यांची उपस्थित असेल. रात्री ७.३० ते ८.३० या वेळेत हा उपक्रम होईल. ‘बायोस्कोप’मधील ‘स्कील स्टुडिओ’मध्ये आज २३ रोजी १२ ते १ या वेळेत रेसूल पुकूट्टी संगीत दिग्दर्शन, संपादन आणि तंत्र जुळणीविषयी मार्गदर्शन करतील. सेव्हन समुराई, गोलमाल व बायसिकल थिव्हज् हे चित्रपट दु. ३, ६ व ९ वाजता थिएटर क्र. १ मध्ये प्रदर्शित होतील. एक प्रेम कथा, सचिन – अ बिलियन ड्रिम्स व आयना का बायना हे चित्रपट संध्याकाळी ३, ६ व ९ वाजता थिएटर क्र. २ मध्ये प्रदर्शित होतील, तर फिरकी, पिंपळ व कट्यार काळजात घुसली हे चित्रपट थिएटर क्र. ३ मध्ये सादर होणार आहेत. रात्री ८.३० वाजता खुल्या मंचावर रोशन पीटर यांचे कातार सादरीकरण होईल.