मोदी-शरीफ ‘फोन पे चर्चा’ दूरध्वनीवरून साधला संपर्क

0
105

भारत-पाकिस्तान दरम्यानचे प्रलंबित राजनैतिक संबंध पुन्हा सुरू करण्याच्या हेतूने पंतप्रधान नरेंद्र ’ोदी यांनी काल दूरध्वनीद्वारे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली. तसेच पाकिस्तानसह अन्य सार्क राष्ट्रांच्या दौर्‍यावर नवे विदेश सचिव जयशंकर यांना पाठविण्याचेही मोदी यांनी स्पष्ट केले.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी कालच शरीफ यांच्याशी संपर्क साधल्यानंतर मोदी यांनीही त्यांच्याशी संपर्क साधला. मोदी यांनी शरीफ यांना आजपासून सुरू होणार्‍या विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेसाठीही पाकिस्तानला शुभेच्छा दिल्या. सार्क देशांशी असलेले संबंध अधिक दृढ करण्यासाठी आपण विदेश सचिव एस. जयशंकर यांना सार्क यात्रेवर पाठविणार असल्याचेही मोदी यांनी शरीफ यांना कळविले.
पाकिस्तान प्रशासनाच्या एका अधिकार्‍याने याविषयी माहिती दिली. दोन्ही देशांदरम्यानचे राजनैतिक संबंध लवकर पूर्ववत झालेले आम्हाला हवे आहेत. मात्र त्यासाठी आम्हाला कोणत्याही अटी घातलेल्या नकोत असे या अधिकार्‍याने सांगितले. भारतीय विदेश सचिव पाकिस्तानात आल्यानंतर सर्व विषयांवर चर्चा होऊ शकेल असेही सदर अधिकारी म्हणाला.