मुख्यमंत्रीपदी मांझी यांची निवड ही चूक होती

0
93

नितीशकुमार यांच्याकडून कबुली
आपला वारसदार म्हणून आपण जीतनराम मांझी यांची मुख्यमंत्रीपदी केलेली निवड चुकीची होती अशी प्रतिक्रिया जेडीयूचे नेते नितीशकुमार यांनी काल येथे व्यक्त केली.
गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत जेडीयूच्या अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन मांझी यांची मुख्यमंत्रीपदी निवड केली होती. आपला हा निर्णय चुकीचा असला तरी त्या निर्णयाचे त्यांनी समर्थन केले.‘त्यावेळी त्यांची (मांझी) नियुक्ती करण्याचा निर्णय मी चांगल्या हेतूने घेतला होता. आठ महिन्यानंतर हा निर्णय चुकीचा ठरला ही गोष्ट वेगळी’ अशी कबुली कुमार यांनी दिली. यावेळी जेडीयू प्रदेशाध्यक्ष वासिष्ठ नारायण सिंग व पक्षाचे ज्येष्ठ नेते विजय चौधरी व शाम रजवू उपस्थित होते.
मांझी यांनी नितीशकुमार सत्तेसाठी हपापलेले आहेत अशी जी प्रतिक्रिया व्यक्त केली होती त्यावर भाष्य करण्यास कुमार यांनी नकार दिला. मांझी मुख्यमंत्रीपदी आरूढ झाल्यानंतर दोन-तीन महिन्यांनी मांझी व त्यांच्या समर्थकांच्या कारवायांची माहिती लोकांकडून व पक्ष कार्यकर्त्यांकडून मिळत होती असे ते म्हणाले. या पार्श्‍वभूमीवर पक्षाचे नेतेव कार्यकर्त्यांकडून सरकारचे नेतृत्व करण्याचा दबाव वाढल्यमुळे पुन्हा नेतृत्व करणे आपल्याला भाग पडले असे कुमार म्हणाले. आता एकदा आपण नेतृत्व स्वीकारले असून यापुढे बिहारात भाजपला पुन्हा सत्ता मिळू न देण्याचा आपला निर्धार आहे असे त्यांनी स्पष्ट केले.