कॉंग्रेस महासचिवपदाचा माकन यांचा राजीनामा

0
93

दिल्ली विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून उतरवल्या गेलेल्या अजय माकन यांनी पक्षाच्या दारूण अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून कॉंग्रेस महासचिवपदाचा राजीनामा दिला. तसेच आम आदमी पक्षाच्या अभूतपूर्व विजयाबद्दल त्यांनी या पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदनही केले आहे.निवडणूक प्रचारादरम्यान दिलेल्या आश्‍वासनांची आम आदमी पक्ष पूर्तता करील अशी आशाही माकन यांनी व्यक्त केली आहे. ‘मी दिल्ली निवडणुकीत कॉंग्रेसचा चेहरा होतो. या निवडणुकीत पक्षाचा पाडाव झाल्यामुळे मी कॉंग्रेसच्या महासचिवपदाचा राजीनामा देत आहेत’ असे माकन यांनी जाहीर केले. माकन कॉंग्रेसच्या निवडणूक प्रचार मोहिमेचे अध्यक्षही होते. ते कॉंग्रेसचे सदर बाजार मतदारसंघाचे उमेदवार होते. सन २०१३च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे ८ आमदार निवडून आले होते. मात्र यावेळी त्यांना आपले खातेही उघडता आले नाही.