मांझी यांचा राजीनाम्यास नकार

0
82

बिहारच्या मुख्यमंत्रीपदावरून आपण पायउतार होणार नसल्याचे जीतनराम मांझी यांनी काल येथे एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. मात्र या भेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.
मांझी यांनी नीती आयोगाच्या बैठकीतही भाग घेतला. त्यानंतर त्यांची मोदी यांच्याबरोबरील बैठक ४० मिनिटे चालली. मात्र आपण त्यांच्याशी राजकीय चर्चा केली नाही असे ते म्हणाले. मोदी यांनी बिहारसाठी काही चांगली कामे केली आहेत आणि त्यासाठी आम्ही त्यांना धन्यवाद दिले असे त्यांनी सांगितले.येत्या २० रोजी आपण बहुमत सिध्द करण्यासाठी विधानसभेत शक्ती प्रदर्शन करणार. यावेळी जो कोणी पाठिंबा देईल त्याच्याकडून आपण तो घेणार असेही त्यांनी स्पष्ट केले. आपण मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाही. जनता दल (यू) जे काही आपल्याला सांगेल तसे आपण करू असे त्यांना वाटते. मात्र तो त्यंाचा गैरसमज आहे, ते म्हणाले.
मुख्यमंत्रीपदी आपले वारसदार म्हणून नितीश कुमार यांनीच मांझी यांची निवड केली होती. मात्र मांझी यांनी बंडखोरी केली आहे. २४३ सदस्यीय बिहार विधानसभेत संयुक्त जनता दलाचे ११५ आमदार असून राजद (२४), कॉंग्रेस (५) व भाकप (१) यांच्या पाठिंब्यामुळे त्यांची एकूण संख्या १४७ वर जाते. बहुमतासाठी १२२ एवढे संख्याबळ आवश्यक आहे. मांझी यांना डझनभर जद यू आमदारांचा पाठिंबा आहे. भाजपचे ८८ आमदार आहेत.