संयुक्त जनता दलात फूट पाडण्याचा भाजपकडून प्रयत्न

0
99

संयुक्त जनता दलाकडून आरोप
बिहारमधील विद्यमान राजकीय स्थितीस सत्ताधारी संयुक्त जनता दलाने भारतीय जनता पक्षास जबाबदार धरले आहे. भाजप संयुक्त जनता दलात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. असे असले तरी राज्यपाल किंवा राष्ट्रपतींसमोर पक्षाच्या १३० उमेदवारांना उभे करण्याची तयारी असल्याचा संयुक्त जनता दलाने दावा केला आहे.बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी हे भाजपच्या इशार्‍यांवर कारवाया करत असल्याचा अशी प्रतिक्रिया संयुक्त जनता दलाचे प्रवक्ते के. सी. त्यागी यांनी व्यक्त केली आहे. या पार्श्‍वभूमीवर मांझी यांना दिल्लीतील नीती आयोगाच्या बैठकीस उपस्थित राहण्याचा कोणताही अधिकारी नाही. त्यांनी पक्षाच्या बहुसंख्य आमदारांचा विश्‍वास गमावला आहे. या पक्षाच्या विधीमंडळ गटाने नीतिश कुमार यांची नवे विधीमंडळ नेते म्हणून निवड केली आहे.
मांझी रविवारी पंतप्रधान मोदी यांची भेट घ्यावयाचे असल्याविषयी पत्रकारांनी विचारले असता त्यागी यांनी सांगितले की भाजपाचे अध्यक्ष अमित शहा हे सध्या आपल्या पक्षात फूट पाडण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तीच गोष्ट ते तृणमूल कॉंग्रेस पक्षाबाबतही करत आहेत. मात्र त्यांना त्यात अपयश आले आहे. मांझी यांनी मुख्यमंत्रीपदावरून पाय उतर होण्यास नकार दिला आहे. शनिवारी झालेली पक्षाची बैठक घटनाविरोधी असल्याचे कारण त्यांनी दिले आहे. तसेच मांझी विधानसभा बरखास्त करण्यासही अनुकूल आहेत. बिहारचे भाजप प्रमुख सुशील कुमार मोदी यांनी तशी मागणी केली आहे. मात्र त्यागी यांनी विधानसभा बरखास्तीस विरोध दर्शविला आहे. सध्यास्थितीत विधानसभेच्या पटलावर बहुमत सिध्द करण्याचाच पर्याय आहे.