महिलांसाठी राखीवता तीन कार्यकाळासाठी

0
88

जिल्हा पंचायत निवडणुका
जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी महिलांसाठी राखीव ठेवलेले मतदारसंघ पुढील तीन कार्यकाळासाठी बदलणार नसल्याचे पंचायत संचालक गुरुदास पिळर्णकर यांनी सांगितले. महिलांसाठी एकूण १७, इतर मागास वर्गासाठी १४ तर मागास जमातीसाठी सहा मतदारसंघ राखीव ठेवले आहेत.वरील निवडणुकीसाठी दक्षिण व उत्तर गोवा या दोन्ही जिल्हा पंचायतींमध्ये मिळून इतर मागास वर्गियांसाठी १४ मतदारसंघ राखून ठेवले आहेत. त्यात उत्तर गोव्यातील हरमल, धारगळ, शिवोली-मार्ना, थिवी, साळगाव, चिंबल, मये, वायंगिणी या तर दक्षिण गोव्यात इतर मागासवर्गियांसाठी राखून ठेवण्यात आलेल्या मतदारसंघांमध्ये उसगाव, गांजे, बांदोडा, बोरी, चिंचिणी, नावेली, रिवण या मतदारसंघांचा समावेश आहे.
महिलांसाठी उत्तर गोव्यात मोरजी, शिवोली-सडये, सिरसई, सुकूर, सांताक्रुझ, खोर्ली, कारापूर-सर्वण, पाळी-कोठंबी, होंडा या मतदारसंघाचा तर दक्षिण गोव्यातील बेतकी-खांडोळा, कवळे, राय, वेळ्ळी, गिर्दोली, सावर्डे, शेल्डे, पैंगीण या मतदारसंघांचा समावेश आहे. तसेच मागास जमातीसाठी सेंट लॉरेन्स हा उत्तर गोव्यातील एकमेव मतदारसंघ राखीव ठेवला आहे, तर दक्षिण गोव्यात मागास जमातीसाठी वेलिंग-प्रियोळ, राशोल, बाळ्ळी-अडणे, बार्शे व खोला हे मतदारसंघ राखीव ठेवले आहेत.
मतदारसंघांच्या फेररचनेच्या बाबतीत जनतेकडून ८०८ सूचना तर ३६ हरकती आल्या होत्या, अशी माहिती संचालक पिळर्णकर यांनी दिली.
आचारसंहितेबाबत गोंधळ
राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा पंचायत निवडणुकीची आचारसंहिता २८ फेब्रुवारीपासून लागू होणार असल्याचे म्हटले असले तरी आचारसंहिता नियमानुसार निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याच्या दिवसापासून आचारसंहिता लागू होते. त्यामुळे या विषयावरून सध्या गोंधळ सुरू आहे.
खर्च मर्यादा १ लाख
गेल्या वेळी जिल्हा पंचायत निवडणुकीतील उमेदवारांना खर्च मर्यादा रु. ७५ हजार इतकी होती. यावेळी ती वाढविण्यात आली असून रुपये १ लाख केली असल्याचे राज्य निवडणूक आयुक्त डॉ. एम. मुदस्सीर यांनी सांगितले.