पर्यटकांना लुटल्याप्रकरणी तीन संशयित गजांआड

0
125

पर्वरी पोलिसांची यशस्वी कारवाई
गोव्यात पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांना वाटेन अडवून त्यांच्याकडील रोख रक्कम तसेच दागदागिने लुटून मारहाण केल्याप्रकरणी पर्वरी पोलिसांनी तिघा संशयित वाटमार्‍यांना शिताफीने अटक केली. हे थरारनाट्य बुधवारी रात्री उशिरा कळंगुट येथे घडले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्यटनास आलेल्या आणि कळंगुट येथे हॉटेलात वास्तव्यास असलेले तीन पर्यटक मदन मोहन (आंध्र प्रदेश), पी. बाळकृष्ण (उत्तर प्रदेश ) आणि विजय कुमार (उत्तर प्रदेश) यांना कळंगुट येथील डॉल्ङ्गिन सर्कलपाशी महंमद जावीर शाह (उत्तर प्रदेश), हमीद शाह (उत्तर प्रदेश) आणि झाकीर शेख (उत्तर कर्नाटक) यांनी अडवून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. हे संशयित चोरटे माएस्ट्रो – जीए – ०३, एए – ९५१२, हिरो डिलक्स – केए – ०३, ओआर – ५७४३ आणि एक्टिव्हा – जीए – ०३ – बी – ८३२४ या तीन दुचाक्यांवरून आले होते. त्यांनी वरील पर्यटकांना चाकूचा धाक दाखवून पिळर्ण येथील एसबीआयच्या एटीएममध्ये नेऊन पाच हजार रोख रक्कम काढण्यास भाग पाडले. नंतर पिळर्ण मार्गावरील एका सुनसान जागी नेऊन सर्व पर्यटकांना लोखंडी सळईने बेदम मारहाण केली, आणि चाकूच्या धाकाने त्यांच्याजवळील सोन्याची साखळी, अंगठी आणि वीस हजार रुपयांची रोख रक्कम उकळली.
हे लूटमार नाट्य सुरू असताना तिथे काही स्थानिक लोक पोहोचले असता संशयित चोरटे दुचाक्यांवरून पळून गेले. परंतु त्यांपैकी महंमद जावीर शाह पळून जात असताना समोरून येणार्‍या इनोव्हा या गाडीला आपटून खाली पडला. ही संधी साधून जमलेल्या लोकांनी त्याची यथेच्छ धुलाई करून पर्वरी पोलिसांना माहिती दिली. मात्र, तिघांपैकी दोघे संशयित चोरटे पळून जाण्यात यशस्वी ठरले. पर्वरी पोलीस स्थानकाचे निरीक्षक ब्रँडन डिसोझा, उपनिरीक्षक विलेश दुर्भाटकर फौजफाट्यासह घटनास्थळी आले आणि त्यांनी लोकांनी पकडलेला संशयित महंमद याला ताब्यात घेतले. यानंतर पोलिसांनी रात्रभर शोध मोहीम राबवून पळून गेलेल्या हमीद शाह आणि शाकीर शेख या दोघाही संशयित चोरट्यांना पहाटे साडेपाच वाजता कळंगुट परिसरातून ताब्यात घेतले. शोधकार्यात हवालदार नितीन परब, गजा सावंत, रितेश नाईक, ङ्ग्रांसिस ङ्गर्नांडीस, रामकृष्ण कळंगुटकर, तुकाराम पेडणेकर, ज्ञानेश्‍वर मळीक, सुरेश देसाई, संदीप घोडगे आणि गौरेश लोंढे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान, अटक केलेल्या तिघाही संशयित चोरट्यांना म्हापसा येथील न्यायदंडाधिकार्‍यांसमोर हजर केले असता त्यांची चार दिवसांच्या रिमांडवर पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक चौकशी करीत असून गोव्यात इतर ठिकाणी त्यांनी वाटमारी करून अनेकांना लुटल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.