‘बुस्टर’द्वारे पाणी खेचणार्‍यांवर कारवाई

0
89

जलवाहिन्यांतील पाणी खेचण्यासाठी काही लोक बुस्टरचा वापर करीत आहेत. त्यामुळे मुबलक प्रमाणात पाण्याचा पुरवठा असूनही पाणी सर्व ग्राहकांपर्यंत पोचण्यास अडथळा येतो. या कारणामुळे राज्यात पाणी टंचाई भासत असल्याने पोलीस संरक्षण घेऊन वरील बुस्टर काढून टाकणार असल्याचे जलस्रोतमंत्री विनोद पालयेकर यांनी सांगितले.
उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण होणे ही गंभीर बाब आहे. खात्याच्या कर्मचार्‍यांनी बुस्टर काढण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित लोक कर्मचार्‍यांना हाकलून लावतात व त्यांच्याकडे उद्धटपणाने वागतात. त्यामुळे बुस्टर काढणे शक्य होत नाही. त्यामुळेच पोलीस संरक्षण घेण्याचे ठरविले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.