स्वच्छता सर्वेक्षणात पणजीला ९० वे स्थान

0
92

>> मध्यप्रदेशचे इंदूर शहर सर्वांत स्वच्छ

केंद्र सरकारने काल स्वच्छता सर्वेक्षणाचा निकाल जाहीर केला असून अनेकविध प्रयत्नानंतरही गोव्याची राजधानी पणजीचे स्थान १६ व्या स्थानावरून ९० व्या क्रमावर घसरले आहे. विशेष म्हणजे ४३४ शहरांच्या यादीत ३ वर्षांपूर्वी १४९ व्या क्रमांकावर असलेले मध्यप्रदेशचे इंदूर शहर देशातील सर्वांत स्वच्छ शहर ठरले आहे.
मध्यप्रदेशातील भोपाळ (दुसरे), तृतीय – विशाखापट्टणम (आंध्र), चौथे – सुरत (गुजरात), पाचवे – म्हैसूर (कर्नाटक), सहावे – तिरुचिरापल्ली (तामिळनाडू), सातवे – एनडीएमसी (दिल्ली), आठवे – नवी मुंबई (महाराष्ट्र), नववे – तिरुपती (आंध्र) व दहा – वडोदरा (गुजरात) यांनी क्रमांक पटकाविले आहेत. सर्वांत शेवटचा क्रमांक गोंडा (४३४) शहराला मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणशी शहराने मोठी प्रगती केली असून ४१८ व्या स्थानावरून चक्क ३२ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. पहिल्या ५० स्वच्छ शहरांमध्ये स्थान मिळवणारे वाराणशी उत्तर प्रदेशातील एकमेव शहर ठरले आहे.
काल देशातील ४३४ स्वच्छ शहरांची यादी जाहीर करण्यात आली. त्यात महाराष्ट्रातील ४४ शहरांचा समावेश आहे. टॉप टेनमध्ये फक्त सात शहरांना जागा मिळाली असून महाराष्ट्रातील केवळ नव्या मुंबईला स्थान मिळाले आहे.