धार्मिक स्थळ विटंबना : एटीएसमार्फत तपास सुरू

0
88

>> सासष्टी तालुक्यातील तिन्ही ठिकाणांची केली पाहणी

सासष्टी तालुक्यातील मडगांव, कुडतरी, पारोडा येथील क्रॉस व मंदिरातील नंदी व तुळशीवृंदावने मोडतोड प्रकरणी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दखल घेऊन गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देताच पोलिस प्रमुखांच्या निर्देशांवरून अतिरेकी विरोधी पोलिसांनी (एटीएस) तपास केला. काल त्यांनी मोडतोड केलेल्या सर्व क्रॉस व तुळशीवृंदावनांची पहाणी केली. वरीष्ठ पोलिस अधिकार्‍याच्या नेतृत्वाखाली खास तुकडी स्थापन करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी गुगल मॅपिंगचा वापर करून आठवड्यांतील सातही दिवसांत चोवीस तास गस्त ठेवण्याचे आदेश देताच पोलिस प्रमुखांनी दखल घेतली. कुंकळ्ळी मतदारसंघातील पारोडा चंद्रनाथ पर्वताजवळ केलेल्या मोडतोड प्रकरणी पोलिस तपासासाठी गेले असता आमदार क्लिवोफात डायस यांनीही त्या पथकाची भेट घेवून तपास तीव्र गतीने करण्याची मागणी केली. गेल्या दहा दिवसांमागे सावर्डे येथे एक घुमटीची मोडतोड केली होती. मंगळवारी रात्रौ माकाझान येथेही क्रॉसची मोडतोड करण्यात आली. तपास कामा दरम्यान पोलिसांनी काहीच सांगण्यात नकार दिला. या क्रॉस व सायबीणीच्या मूर्ती हिंदूनी दिल्या होत्या.

 
आमदार क्लिवोफात डायस यांनी सांगितले की, आपण मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेवून क्रॉस मोडणार्‍या गुन्हेगारांचा तपास करण्याची मागणी आपण केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी याची आपण दखल घेवून पोलिसांना आदेश दिल्याचे सांगितले व काल पोलिसांना तपासासाठी पाठवून मुख्यमंत्र्यांनी वचन पाळले आहे. आपण त्यांचे आभार मानतो, असेही सांगितले.