बाणावलीत फ्लॅट फोडून सात लाखांचा ऐवज लंपास

0
110

पेडा-बाणावली येथे तीन फ्लॅट फोडून सात लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी पळविला. नवहिंद टाईम्सचे जाहिरात विभाग प्रमुख एंड्रीयान टोरीस यांचा फ्लॅट फोडून रोख ३५ हजार रुपये व ६.५० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने पळविले. चोरट्यांनी दोन सोन साखळ्या, नेक्लेस, मंगळसूत्र, बांगड्या चोरल्या. त्यांनी दर्शनी दरवाजा फोडून आत प्रवेश केला व कपाटातील दागिने व रोख रक्कम पळविली. एंड्रीयान गुरुवारी दुपारी कुटुंबियांसमवेत कोल्हापूर येथे गेले होते. या इमारतीच्या शेजारच्या इमारतीतील बंद असलेले दोन फ्लॅट फोडले. मात्र तेथे चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही.