१४ मे रोजी पंचायत निवडणूक घेण्यास खाते शिङ्गारस करणार

0
104

राज्य निवडणूक आयुक्त आर. के. शर्मा यांनी पंचायत निवडणुका २१ मे रोजी घेण्यात याव्यात अशी शिङ्गारस सरकारला केलेली असली तरी या निवडणुका १४ मे रोजी घेणेच योग्य होणार असे पंचायत संचालनालयाला वाटत असून आपण १४ मे रोजी पंचायत निवडणुका घ्याव्यात अशी शिङ्गारस नव्या सरकारकडे करणार असल्याचे पंचायत खात्याचे संचालक गुरुदास पिळर्णकर यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

पंचायत निवडणुका रविवारीच होत असतात. २१ मे हाही रविवारच आहे. १४ मेही रविवारच आहे. मात्र, ङ्गरक इतकाच आहे की काही कारणामुळे २१ मे रोजी ठरवलेल्या निवडणुका रद्द कराव्या लागल्या तर मग त्या २८ मे रोजी घ्याव्या लागतील. पण तसे झाले तर मोठी अडचण होईल. कारण मागच्या वेळी २८ मे रोजीच पंचायत निवडणुका झाल्या होत्या. त्यामुळे त्यापूर्वीच निवडणुका होऊन नव्या पंचायती स्थापन होण्याची गरज आहे. त्यामुळे त्यासाठी किमान आठवडाभराची मुदत मिळणे आवश्यक असल्याचे पिळर्णकर म्हणाले.
निवडणुका झाल्या व विजयी सदस्यांना विजयाचे प्रमाणपत्र देण्यात आले म्हणून पंचायती स्थापन झाल्या असे होत नाही. सदस्यांनी शपथग्रहण केले त्या दिवशीही पंचायती स्थापन होत नाहीत. तर ज्या दिवशी पंचायतींची पहिली बैठक होते त्याच दिवशी पंचायती कायद्याने स्थापन होतात. आणि निवडणुकीनंतर सगळे सोपस्कार पूर्ण होऊन पंचायती स्थापन होण्यास किमान आठवडाभराचा वेळ लागतो.
त्यामुळे सर्वदृष्टीने विचार करता १४ मे हीच निवडणुका घेण्यास योग्य तारीख ठरणार असल्याचे आपले वैयक्तिक मत असल्याचे गुरुदास पिळर्णकर यांनी सांगितले.
नवे सरकार सत्तेवर आल्यानंतर आपण सरकारला पंचायत निवडणुका १४ मे रोजी घेण्यात याव्यात अशी शिङ्गारस करणार असल्याचे पिळर्णकर यांनी स्पष्ट केले. नव्या सरकारला सत्तेवर आल्यानंतर लवकरच पंचायत निवडणुकांची तारीख जाहीर करावी लागणार असल्याचे ते म्हणाले.