‘फेमा’  उल्लंघन प्रकरणी २०० विदेशींची चौकशी सुरू

0
82

अंमलबजावणी संचालनालयाने विदेशी चलन व्यवस्थापन कायद्याचे (फेमा) उल्लंघन प्रकरणी सुमारे २०० प्रकरणांची चौकशी सुरू केली आहे तर २२ जणांची मालमत्ता ताब्यात घेतली आहे. काल संचालनालयाने पाटो येथील कार्यालयात विदेशी नागरिकांना बोलावून ‘फेमा’ कायद्याची पूर्ण माहिती दिली. काहीजणांना या कायद्याची माहिती नव्हती, असे अधिकार्‍यांनी यावेळी सांगितले.अनेक विदेशी नागरिकांनी गोवा हे निवृत्ती नंतरचे सुट्टीचे केंद्र बनवून बेकायदेशीरपणे वास्तव्य केले आहे. किनारी भागात अनेक विदेशी नागरिक बेकायदेशीरपणे व्यवसाय चालवित आहेत तर काहीजण अमली पदार्थांच्या गैर व्यवसायात गुंतले आहेत. मुख्यमंत्री लक्ष्मिकांत पार्सेकर यांनीही काही दिवसांपूर्वी पोलीस व अन्य संबंधित अधिकार्‍यांची बैठक घेऊन विदेशी नागरिकांच्या गैर व्यवहारावर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले होते. विदेशी नागरिकांचा विषय गोवा विधानसभेतही बराच गाजला होता.