२ हजार कोटींच्या विकासकामांचे प्रस्ताव केंद्र सरकारला सादर

0
96

राज्यातील मालनि:स्सारण योजना, तसेच जुन्या जलवाहिन्या बदलण्याची योजना व महामार्गांचे रुंदीकरण यासंबंधीचे सर्व प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम खात्याने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाला पाठवून दिले आहेत. व त्याचा पाठपुरावाही चालू ठेवला आहे.वरील कामांचे प्रस्ताव, जुवारी पुलाचा खात्याचा कामगिरी अहवाल (डीपी आर) आदी प्रकल्पांसाठीची सर्व कागदपत्रे खात्याने तयार ठेवली होती. गेल्या आठवड्यात संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या मदतीने साबांखामंत्री सुदीन ढवळीकर व साबांखाच्या अधिकार्‍यांच्या पथकाने केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी व मंत्रालयाच्या अधिकार्‍यांबरोबर बैठक घेऊन मुंबई ते कोंकण पर्यंतच्या मार्गाच्या कॉंक्रिटीकरणाच्या प्रकल्पात गोव्यातील महामार्गांचा समावेश करण्याची व वरील विकास प्रकल्पास सहकार्य करण्याची मागणी केली होती. श्री. गडकरी यांनी सर्व प्रकल्पाचे प्रस्ताव ताबडतोब मंत्रालयाला सादर करण्यास सांगितले होते. त्यामुळे येथील साबांखा अधिकार्‍यांनी धावपळ करून सर्व प्रस्ताव पाठविले आहेत. जलवाहिन्या बदलण्यासाठी किमान ४५० कोटी रुपये खर्च येणार आहे. मलनि:सारणसाठी सुमारे २०० कोटी तर महामार्गांसाठी सुमारे १५०० कोटींची गरज आहे.