डॉम्निक व जुआनच्या तडीपारचा आदेश उच्च न्यायालयाकडून रद्द

0
5

उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेला शिवोली येथील पास्टर डॉम्निक डिसोझा आणि त्याची पत्नी जुआन यांच्या तडीपारचा आदेश काल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने रद्द केला आहे. प्रलंबित आणि सुनावणी सुरू असलेल्या खटल्यांची दखल घेऊन संबंधिताला तडीपार करता येऊ शकत नाही, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदविले आहे.
शिवोली येथील फाईव्ह पिलर्स चर्चचे पास्टर डॉम्निक डिसोझा यांनी तडीपार आदेशात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आवाहन दिले होते.

म्हापसा येथे पास्टर डॉम्निक डिसोझा व त्याची पत्नी जुआन यांच्याविरोधात धर्मांतर, जादूटोणाप्रकरणी तक्रारी नोंद आहेत. या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी पास्टर डॉम्निक डिसोझा याला अटक करून त्याची जामिनावर सुटका केली आहे. उत्तर गोवा पोलीस अधीक्षकांनी केलेल्या अर्जामुळे उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी पास्टर डॉम्निक डिसोझा आणि त्याच्या पत्नीला उत्तर गोव्यातून तडीपार करण्याचा आदेश जारी केला. पास्टर डॉम्निक डिसोझा यांनी उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाला मुख्य सचिवाकडे अर्ज करून आव्हान दिले होते. मुख्य सचिवांनी पास्टर डॉम्निक याचा अर्ज फेटाळून लावला होता.