फर्म पिगासस सॉफ्टवेअरद्वारे फोन टॅप ः सुब्रह्मण्यम स्वामी

0
46

इस्राईलच्या फर्म पिगासस या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून फोन टॅप केले जात असल्याचे भाजपचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी काल सांगितले.

याबाबतची माहिती भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्वीट करून दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा फोन टॅपिंग प्रकरणावरून चर्चा सुरू झाली आहे. जवळपास २५०० लोकांचे फोन टॅप करण्यात आले असून त्यात मंत्री, नेते, न्यायाधीश आणि पत्रकारांचे फोन टॅप झाल्याचे सांगण्यात येत आहे.

खासदार स्वामी यांनी, वॉशिंग्टन पोस्ट आणि लंडन गार्डियनमध्ये एक रिपोर्ट प्रकाशित केला जाणार असून त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री, संघाचे नेते, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि पत्रकारांचे फोन टॅप करण्याचे काम इस्रायलच्या फर्म पिगासस दिल्याचा खुलासा केला जाणार आहे. मला याची माहिती मिळाली तर मी यादी प्रसिद्ध करेन, असे ट्वीट केले आहे. मात्र वॉशिंग्टन पोस्ट आणि लंडन गार्डियनच्या वेबसाईटवर याबाबत कोणताच दावा केलेला नाही.
पिगाससच्या माध्यमातून एकाच वेळी ५० मोबाईलवर नजर ठेवली जाऊ शकते. पिगासस सॉफ्टवेअर यूजर्सच्या परवानगीशिवाय फोन ऑफ-ऑन आणि फॉर्मेट करू शकतो.