राज्यात कोरोनाने रविवारी दोन बळी, १२० नवे बाधित

0
48

>> कोरोना पॉझिटिव्हिटी २.६४ टक्के

राज्यात चोवीस तासात नवे १२० रुग्ण आढळून आले आहेत. तर, २ कोरोना रुग्णांच्या बळींची नोंद झाली आहे. राज्यातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या १५६२ एवढी झाली आहे. तर, कोरोना बळींची एकूण संख्या ३१११ एवढी आहे. राज्यातील नवीन रुग्णांमध्ये वाढ होण्याचे प्रमाण आता कमी होऊ लागले आहे.

राज्यात जुलै महिन्यात कोरोना रुग्णांच्या बळीमध्ये चढउतार सुरू आहे. यापूर्वी दोनवेळा शून्य बळींची नोंद झाली होती. राज्यात सध्या नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण २.६४ टक्के एवढे आहे. काल रविवारी इस्पितळांतून १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ६९ हजार ७४० एवढी झाली आहे.
चोवीस तासांत ४५४० स्वॅबच्या नमुुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील १२० नमुने पॉझिटिव्ह आढळून आले.

मडगाव येथे सर्वाधिक १२७ रुग्ण आहेत. कुठ्ठाळी येथे १०० रुग्ण आहेत. राज्यातील इतर भागांतील रुग्णसंख्या शंभरपेक्षा कमी आहे. डिचोली येथे ४६, साखळी ४५, पेडणे ६८, वाळपई ३०, म्हापसा ५०, पणजी ७६, कांदोळी ४७, कासारवर्णे १०, कोलवाळ २७, शिवोली ७९, पर्वरी ३२ असे उत्तर गोव्यात बाधित आहेत. दक्षिण गोव्यात कुडचडे ४३, काणकोण ४४, वास्को ५९, बाळ्ळी ४३, कासावली ४५, चिंचिणी ५३, कुडतरी ५४, लोटली ३५, मडकई २७, केपे ३२, सांगे ४३, शिरोडा ३३, धारबांदोडा ४३, फोंडा ८६ व नावेली २७ रुग्ण आहेत. नवीन १५ रुग्णांना काल इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

नवीन १०५ जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. राज्यातील आणखी २१९ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ६५ हजार ०६७ एवढी झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२५ टक्के एवढे आहे.