पेडण्यात ४ लाखांची बनावट दारू जप्त

0
101

पेडणे तालुक्यातील पत्रादेवी या राष्ट्रीय महामार्ग १७ वरून राजस्थान येथे बनावट दारू घेऊन जाणारा ट्रक अबकारी खात्याने पकडून ४ लाखांची बनावट दारू जप्त केली. आरजे २७ जीए- ५७८१ क्रमांकाचा कंटेनर ४ लाख रुपये किंमतीची अवैध दारू घेऊन राजस्थानला निघाला होता. पत्रादेवी येथे अबकारी नाक्यावर हे वाहन पोचताच या वाहनाचा संशय आल्याने अबकारी विभागाच्या अधिकार्‍यांनी कागदपत्रांची तपासणी करून चालकाला दाखवण्यास सांगितली. मात्र, चालकाने टाळाटाळ केली त्यामुळे संशय बळावला. यावेळी कंटेनरचा चालक अधिकार्‍यांची नजर चुकवून वाहन टाकून फरारी झाला. कंटेनरमध्ये १२०० दारूचे बॉक्स सापडले. या वर्षाची ही मोठी कारवाई आहे. अबकारी निरीक्षक अमोल हळवलकर, अंकुश कानोळकर, देवू राऊत, सिध्दार्थ विर्नोडकर, बाबू चोडणकर, तातू पटेकर, दत्ता गावकर, मुरलीधर नाईक, कृष्णा गुरव, विजय पिळगावकर, नरेश नाईक, विठोबा मालवणकर, नितीन परब, दशरथ तारी, सागर सामंत यांनी ही कारवाई केली.

अबकारी नाका धोकादायक
पत्रादेवी येथे हुतात्मा स्मारकाच्या जवळ राष्ट्रीय महामार्ग क्र. १७ वर असलेल्या अबकारी नाका अत्यंत धोकादयक स्थितीत आहे. या नाक्याची आजपर्यंत सरकारने दुरुस्ती केलेली नाही. चार पत्रे आडवे उभे करून हा हंगामी स्वरुपाचा नाका भविष्यात कर्मचार्‍यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे.