पहिले चार्टर विमान ४९१ पर्यटकांसह दाखल

0
94

दरवर्षी प्रमाणे यंदाही गोवा पर्यटन हंगाम वेळेवर सुरू झाला असून यंदाच्या हंगामातील पहिले चार्टर विमान काल गोव्यात ४९१ विदेशी पर्यटकांना घेऊन दाबोळी विमानतळावर दुपारी ३ वाजता दाखल झाले. या विदेशी पर्यटकांचे स्वागत गोवा पर्यटन विभागातर्फे करण्यात आले. मॉस्को, रशिया येथून ‘एअर रशिया’ या पर्यटक विमानातून ४९१ विदेशी पर्यटक काल गोव्यात दाखल झाले.