महायुती आवश्यक : लुईझिन

0
89

>> वास्को महिला मेळाव्यात सरकारवर टीका

 

भाजपने गोव्याला ऋणात टाकले असून ९० टक्के लोक सरकारवर नाराज आहेत. यामुळे भाजपला आगामी निवडणुकीत धडा शिकवण्यासाठी महायुती अत्यंत आवश्यक असल्याने प्रतिपादन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी काल वास्को येथे केले.
वास्को गट कॉंग्रेस समितीतर्फे टुरिस्ट हॉस्टेल सभागृहात आयोजित महिला मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे, माजी मुख्यमंत्री रवी नाईक, माजी खासदार फ्रान्सिस सार्दीन, प्रदेश महिला अध्यक्ष सुनिता वेरेकर, एम. के. शेख, वास्को गटाध्यक्ष विशाल नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
विरोधी पक्षनेते श्री. राणे यांनी भाजपने गोवा नष्ट करण्याचा डाव आखला असल्याचा आरोप करत गोवा वाचवण्यासाठी सर्व महिलांनी महिषासुरमर्दिनीचे रूप धारण करावे असे आवाहन केले.