पणजी पोटनिवडणुकीचा निकाल आज

0
104

गेल्या १३ रोजी झालेल्या पणजी पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर करण्यात येणार असून मतमोजणी आज सकाळी ८ वाजल्यानंतर सुरू होणार आहे. मतमोजणी जुन्या गोमेकॉत होणार आहे.
भाजपचे उमेदवार सिध्दार्थ कुंकळ्येकर, कॉंग्रेसचे उमेदवार सुरेंद्र फुर्तादो, अपक्ष उमेदवार समीर केळेकर व सदानंद वायंगणकर यांनी ही निवडणूक लढवलेली असून कोणाचा विजय होईल हे आज मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.भाजपचे मनोहर पर्रीकर यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन केंद्रीय संरक्षण मंत्रीपद स्वीकारल्यामुळे ही पोटनिवडणूक घ्यावी लागली होती. त्यांच्या राजीनाम्यामुळे भाजपचे विधानसभेतील संख्याबळ २१ वरून २० वर आलेले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर भाजपसाठी हा निकाल महत्त्वाचा व प्रतिष्ठेचा मानला जात आहे.
गेल्या ५ विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला पणजीत विजय प्राप्त झालेला नसल्याने यंदा तरी आपला विजय होईल काय याकडे कॉंग्रेसचे लक्ष लागून राहिले आहे.