नीरज चोप्राचा महापराक्रम

0
118

>> भालाफेफमध्ये सुवर्णपदक मिळविणारा पहिला भारतीय ऍथलिट

नीरज चोप्राने महापराक्रमी कामगिरी करताना आशिया क्रीडा स्पर्धेच्या भालाफेक प्रकारात सुवर्ण पदक मिळविणारा पहिला भारतीय ऍथलिट बनला आहे. जकार्तामध्ये काल नीरजने स्वतःचा राष्ट्रीय विक्रम मोडित काढताना ८८.०६ मीटरचे अंतर कापले.
या सुवर्ण पदाबरोबर नीरज आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात भारतातर्फे भालाफेकमध्ये पदक मिळणारा दुसरा भारतीय ऍथलिट ठरला आहे. यापूर्वी नवी दिल्लीत १९२८ साली झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत गुरतेज सिंगने कांस्य पदक मिळवित भालाफेकमध्ये पदक मिळविणारा पहिला खेळाडू बनण्याचा मान मिळविला होता. नीरजने राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावले होते.

हरयाणाच्या पानिपत येथील या २० वर्षीय युवा खेळाडूला यंदाच्या उद्घाटन सोहळ्यात भारतीय पदकाचा ध्वजवाहक बनण्याचा मान मिळाला होता आणि त्याने त्यावर कळह चढविताना सोनेरी कामगिरी करीत आपली निवड सार्थ असल्याचे दाखवून दिली.

नीरजने आपल्या तिसर्‍या प्रयत्नात ८८.०६ मीटर दूर भाला फेकत आपले सुवर्ण पदक निश्‍चित केले होते. तत्पूर्वी पहिल्या प्रयत्नात त्याने ८३.४६ मीटर भाला फेकला होता. तर दुसरा प्रयत्न बाद ठरला होता. चीनच्या लिउ क्विझेनने ८२.२२ मीटर भाला फेकत रौप्यपदक तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ८०.७५ मीटरचे अंरत कापत कांस्य पदक प्राप्त केले.

नीरज चोप्रा हा विश्व कनिष्ठ स्पर्धा विक्रम धारक आहे. त्याने ८६.४८ मीटरचे अंतर कापत हा विक्रम नोंदविला होता. या मोसमात तो जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने मार्चमध्ये झालेली फेडरेशन कप स्पर्धा ८५.९१ मी. भाला फेकत जिंकली. त्यानंतर राष्ट्रकूल स्पर्धेत ८६.४७ अंतर कापत सुवर्णपदक मिळविले. मे महिन्यात दोहामध्ये झालेली डायमंड लीग स्पर्धा ८७.४३ मीटर भाला फेकत जिंकत नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला होता. तर आशियाई स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी फ्रान्स आणि फिनलँड येथील स्पर्धांमध्ये अनुक्रमे ८५.१७ व ८५.६९ मीटर दूर भाला फेकला होता.
सुवर्णपदक प्राप्त केल्याबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरजचे अभिनंदन केले आहे.