विकास, अमित उपांत्यपूर्व फेरीत

0
89

सलग तिसर्‍या आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक मिळविण्याच्या शर्यतीत असलेल्या विकास कृष्णन याने बॉक्सिंगच्या ७५ किलो वजनी गटातून उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले आहे. काल झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीत त्याने पाकिस्तानच्या तन्वीर अहमद याचा ५-० असा पराभव केला. विकासने २०१० साली या स्पर्धेत सुवर्ण व २०१४ साली कांस्यपदक जिंकले होते.

‘अंतिम ८’मध्ये त्याचा सामना चीनच्या तुओहेता एरबिके तांगलाथियान याच्याशी होणार आहे. पुरुषांच्या फ्लायवेट (४९ किलोंखालील) गटात अमितने मंगोलियाच्या खारकू एनखामानदाख याला ५-० असे हरवून आगेकूच केली. सर्व पाचही पंचांनी अमितच्या बाजूने ३०-२६, ३०-२५, ३०-२५, ३०-२६, ३०-२६ असा निकाल दिला. बँटमवेट गटामध्ये (५६ किलो) मोहम्मद हुसामुद्दिन याला २-३ असा निसटता पराभव स्वीकारावा लागला. पंचांनी मंगोलियाच्या खारकू इन्खणार याच्याबाजूने ३०-२७, २९-२८, २ ७-३०, २७-३०, २९-२८ असा निकाल दिला. वॉल्टरवेट गटात (६४ किलो) धीरजने किर्गिस्तानच्या नुरलान याला ३-० असा धक्का देत पदकाची आशा कायम ठेवली.