साळावली धरणावर महिलेचा आत्महत्येचा अयशस्वी प्रयत्न

0
103

साळावली धरणावर आलेल्या मानसिक संतुलन बिघडलेल्या एका महिलेने रविवारी आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र तो प्रयत्न अयशस्वी ठरला. यावेळी घटनास्थळी उपस्थित लोकांनी त्या महिलेला समजाविण्याचा व रोखण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र तिने उडी घेतली. सुदैवाने तिने बॉटनिकल गार्डनच्या बाजूने खाली उडी घेतल्याने ती बचावली.

पोलीसांनी सांगे आरोग्य केंद्रात सदर महिलेला उपचारार्थ दाखल केले. रागाचा पारा दुसर्‍या दिवशी उतरताच सांगे पोलीसांना पाय घसरून पडल्याची जबानी तिने दिली. सोशल मिडीयावरून या घटनेचा व्हिडीओ सर्वत्र पसरल्याने चर्चेला उत आला. रविवार असल्याने संध्याकाळच्या वेळी धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची वर्दळ होती. सदर महिला आपल्या मुलांना सोबत घेवून आली होती. धरणाच्या पाण्यात आत्महत्या करण्याचा प्रथम बराच प्रयत्न तिने केला. पण लोकांनी तिला रोखून असे न करण्याची समज दिली. आत्महत्त्येचा प्रकार घडल्यास सर्वांनाच धरणावर प्रवेश बंद होणार असे तिला सांगितले. पण त्या महिलेने लोकांशी हुज्जत घालण्यास सुरवात केली. बर्‍याच वेळाने ती जाऊन काठावर बसली. अचानक तिने काठावरून गार्डनच्या बाजूने उडी घेतली व खाली घसरत गेली.