बारावीची पुरवणी परीक्षा 16 मेपासून

0
4

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची पुरवणी परीक्षा येत्या 16 मेपासून घेतली जाणार आहे.
मंडळाने बारावीच्या परीक्षेचा निकाल 21 एप्रिल रोजी जाहीर केला होता. यावर्षी बारावीचा निकाल 85 टक्के लागला. बारावीच्या मार्चमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत सुधारणेची गरज असा शेरा असलेले विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतात. बारावीची पुरवणी परीक्षा म्हापसा आणि मडगाव अशा दोन केंद्रातून घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी येत्या 4 मेपासून ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. पुरवणी परीक्षेसाठी 8 मेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. प्रात्यक्षिक परीक्षा 21 मेपासून घेतली जाणार आहे. परीक्षेचे शुल्क ऑनलाईन पद्धतीनेच भरावे लागणार आहे. मंडळाने मेमधील पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जारी केले आहे, असे मंडळाने कळविले आहे.