दुसऱ्या टप्प्यात 60.96 टक्के मतदानाची नोंद

0
3

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात काल 13 राज्यांतील (एक केंद्रशासित प्रदेश) 88 जागांवर मतदान झाले. या 88 जागांसाठी एकूण 1198 उमेदवार रिंगणात होते. दुसऱ्या टप्प्यात 60.96 टक्के मतदानाची नोंद झाली. त्रिपुरामध्ये सर्वाधिक, तर उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये कमी मतदानाची नोंद झाली.

दुसऱ्या टप्प्यात केरळ (20), कर्नाटक (14), राजस्थान (13), महाराष्ट्र व उत्तर प्रदेश (प्रत्येकी 8), मध्य प्रदेश (6), आसाम व बिहार (प्रत्येकी 5), छत्तीसगड व पश्चिम बंगाल (प्रत्येकी 3) आणि जम्मू-काश्मीर, मणिपूर व त्रिपुरामधील (प्रत्येकी 1) जागांसाठी मतदान झाले. मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासह राजस्थान, केरळ, त्रिपुरा आणि मणिपूरच्या सर्व जागांवर लोकसभेच्या निवडणुका पूर्ण झाल्या आहेत.

अजून पाच टप्प्यातील मतदान बाकी
निवडणूक आयोगाने देशात सात टप्प्यात लोकसभा निवडणुका जाहीर केल्या होत्या. पहिल्या, दुसऱ्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. उर्वरित पाच टप्प्यांचे मतदान होणे बाकी आहे. तिसऱ्या टप्प्यात 94 जागांसाठी मतदान होणार आहे.

कोणत्या राज्यात किती टक्के मतदान

आसाम (71%), बिहार (53%), छत्तीसगड (72.13%), जम्मू-काश्मीर (67.22%), कर्नाटक (63.90%), केरळ (63.97%), मध्यप्रदेश (54.83%), महाराष्ट्र (53.51%), मणिपूर (76.06%), राजस्थान (59.19%), त्रिपुरा (77.53%), उत्तरप्रदेश (52.74%), पश्चिम बंगाल (71.84%).