निवडणूक रोख्यांचा सर्व तपशील एसबीआयकडून आयोगाला सादर

0
4

निवडणूक रोख्यांचा सगळा तपशील सार्वजनिक करावा, त्यात कुठलीही लपवाछपवी नको, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयला मागच्या सुनावणीत झापले होते. आता निवडणूक आयोगाला विशिष्ट क्रमाकांसह निवडणूक रोख्यांचे सर्व तपशील सादर केले आहेत, असे प्रतिज्ञापत्रच एसबीआयने सर्वोच्च न्यायालयात काल सादर केले. स्टेट बँकेचे अध्यक्ष दिनेश कुमार खारा यांनी प्रतिज्ञापत्रात ही बाब नमूद केली.

निवडणूक रोख्यांच्या तपशीलामध्ये रोखे खरेदी करणाऱ्याचे नाव, त्याचे मूल्य आणि विशिष्ट क्रमांक, ज्या पक्षाने तो वटवला त्या पक्षाचे नाव, रोख्यांची पूर्तता करणाऱ्या राजकीय पक्षांच्या बँक खाते क्रमांकाचे शेवटचे चार अंक आणि रोख रकमेचा क्रमांक, ही माहिती या तपशीलातून देण्यात आली आहे. तसेच, खातेधारकांच्या सुरक्षेचा हवाला देत बँकेने राजकीय पक्ष आणि खरेदीदार या दोन्हींचे संपूर्ण बँक खाते क्रमांक आणि केवायसी तपशील उघड करणे टाळले आहे.