दुकानदारांकडून महापालिकेच्या तिजोरीत ३.६४ कोटी जमा

0
91

पणजी महापालिकेला मार्केट प्रकल्प १ व प्रकल्प २ मधून भाड्यापोटी २०१४ सालापर्यंत ३ कोटी ६४ लाख ९४ हजार रु. मिळाले आहेत. पणजी महापालिका मार्केट दुकानदार संघटनेने काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. २०१४ सालापर्यंत फेडलेले हे पैसे असून त्या वर्षानंतर महापालिका व दुकानदार यांच्यात भाड्याच्या प्रश्‍नावरून वाद निर्माण झाल्याने भाडे भरणे अडून पडल्याचे संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र धामस्कर यांनी सांगितले. २०१४ सालापूर्वी महापालिकेला भाड्यापोटी ३० रु. प्रती चौ. मी. दिले जात होते. मात्र त्यानंतर महापालिकेने एकदम २५६ रु. प्रती चौ. मी. अशी भरमसाठ वाढ केली होती.