राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर

0
108

गोवा राज्य कला आणि संस्कृती संचालनालयाचे २०१६-१७ सालचे राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर झाले असून कला व साहित्य क्षेत्रात मौलिक कार्य केलेल्या १२ ज्येष्ठ कलाकारांना या पुरस्काराने सन्मानीत केले जाणार आहे. २०१६-१७ सालची उत्कृष्ट, सांस्कृतिक संस्था म्हणून ‘अंत्रुज लळितक’ बांदिवडे-फोंडा या संस्थेची निवड करण्यात आली आहे.
कलाक्षेत्रातील नाटक, तियात्र, संगीत, साहित्य, चित्रकला, छायाचित्रण, लोकसंगीत, लोककला, हस्तकला, भजन, कीर्तन, चित्रपट आदी विविध प्रकारात विशेष व उल्लेखनीय कार्य करीत लौकीक संपादन करणार्‍या ज्येष्ठ कलाकारांना तसेच एका सांस्कृतीक संस्थेला दरवर्षी या खात्यामार्फत राज्य पुरस्काराने सन्मानीत करण्यात येते. यावर्षी (२०१६-१७) राज्य सांस्कृतिक पुरस्कारप्राप्त मान्यवर खालीलप्रमाणे आहेत.
प्रमोद प्रियोळकर, प्रियोळ-फोंडा (भारतीय संगीत), एफ. जी. आल्वारो दे पेरेरा उर्तोडा (पाश्‍चात्य संगीत), दासू शिरोडकर, तरवळे-फोंडा (साहित्य), गजानन जोग, करंजाळे-तिसवाडी (साहित्य), आवे क्लेटो दे विटाल ओफोंसो, पणजी- (साहित्य), गणेश मराठे, खोर्ली-तिसवाडी (नाटक), मारीया फर्नांडिस, सांगोल्डा-बार्देश (तियात्र), रोमाल्डो डिसोझा, चिंचिणी-सालसेत (तियात्र), उदयबुवा फडके, मुळगाव (कीर्तन), उमेश तारी, ओल्डगोवा- (भजन), राम म्हावूसकर, नगरगाव-सत्तरी (लोककला), सदाशिव परब, मयडे-बार्देश (ललितकला). वैयक्तिक पुरस्काराचे स्वरूप रोख रु. १,००,००० (एक लाख रुपये), प्रशस्तीपत्र, नटराज, श्रीफळ व शाल तर उत्कृष्ट संस्थेला रोख रु. ३,००,००० (तीन लाख रुपये), प्रशस्तीपत्र आणि स्मृतीचिन्ह प्रदान केले जाते. पुरस्कार वितरणाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल असे कळविण्यात आले आहे.