तिळारी महामंडळ बरखास्त

0
80

काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तिळारी जलसिंचन महामंडळ बरखास्त करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. महामंडळातील सर्व कर्मचार्‍यांना जलस्रोत खात्यात सामावून घेतले जाईल, असे पर्रीकर यांनी सांगितले.
काकोडा येथील उद्योगासाठी ठेवलेल्या जागा औद्योगिक भाग म्हणून जाहीर करण्याचा निर्णय घेतल्याने तेथे कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे काम येत्या ऑक्टोबरपासून सुरू होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. डिचोली व सोनसडो येथे प्लास्टिक प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला असून एम. के. एरोमेटिक लिमिटेड या कंपनीला कंत्राट दिल्याचे पर्रीकर यांनी सांगितले.